
Podcast
असंच का बरं ?
Amit Karkare
0 Plays
आपल्या आजुबाजूच्या अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो आणि प्रश्न विचारणंच बंद करुन टाकतो. आता हेच बघा ना... सगळ्या जमातींचे केस शेवटी पांढरेच का होतात? आपल्याला आयुष्यात दोन वेळा दात का येतात? पृथ्वीला एकच चंद्र का? प्लॅस्टीकचा नाश का होत नाही? सोनं चांदी हे धातू स्टीलपेक्षा महाग का? टॅक्सीचा रंग पिवळाच का? सरकारने खूप नोटा छापून गरिंबांमधे वाटल्या तर काय होईल? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले तरी आपण त्यांची उत्तरे शोधत नाही. हे पॉडकास्ट अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी... तुम्हाला पडलेले प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची उत्तरे शोधून तुम्हाला कळवू. पण त्यासाठी आधी विचारा तर खरं, की असंच का बरं ?