
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!नमस्कार मित्र मैत्रिणींनो*ताळेबंद मनाचा* ह्या पॉडकास्ट मधे मी आहे तुमचा मनाचा CA अर्थात मनाचा चार्टर्ड अकाउंटंट, आनंद बेलवलकर!जसा Accountant पैशाचा ताळेबंद मांडतो; तसा आपण मनाचा ताळेबंद मांडणार आहोत. आजच्या धकाधकीच्या अन् गुंतागुंतीच्या जीवनात आपण मनाची शांती, समाधान हरवत चाललो आहेत. मनाची "देणे" ची बाजू फुगत चाललीय अन् "मालमत्ता" बाजू मात्र रोडावत चालली आहे. हो ना? म्हणूनच मी घेऊन आलोय एक असा पॉडकास्ट ज्या मध्ये प्रेम, नातेसंबंध, ताणतणाव असे बरेच काही असणार आहे शिवाय काही किस्से, कहाणी, अनुभव अन् बरेच शेअरिंग. तेंव्हा share , like आणी Follow करा